Breaking

केज बस स्टँड वरून चमत्कार दाखवतो म्हणून दोघांनी अंगठी पळविली

Updated: फेब्रुवारी 6, 2026

By Vivek Sindhu

साड्या वाटपाचे आमिष दाखवून वृद्धेला लुटले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गौतम बचुटे/केज :- मी नाशिकचा पंडित आहे. तुला चमत्कार दाखवतो असे म्हणून दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून हातचलाखी करून खडा हातात देऊन त्याचा रुद्राक्ष करून दाखविला. त्या नंतर हातातील अंगठी एका कपड्यात ठेवायला लावून त्या अंगठीसह पोबारा केल्याचा प्रकार केज येथील बस स्टँडवर घडला.

दि १ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८.०० वा. च्या सूमारास काशिदवाडी तालुका केज येथील भिमा सोनाजी जाधवर वय ५७ वर्ष हे पुण्याला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर उभे होते. त्या वेळी तिथे एक अनोळखी व्यक्त तिथे आला. त्या नंतर आणखी दुसरा एकजण तिथे आला आणि त्याला तो पाहिला व्यक्ती म्हणाला की, तो नाशिकचा पंडित आहे. तुझ्या काय अडीअडचणी आणि संकटे आहेत त्याचे निराकरण करतो. त्या नंतर दुसऱ्या व्यक्तीने घरातील लग्न जमत नसल्याचे त्याची समस्या सांगितल्या नंतर स्वतःला पंडित म्हणविणाऱ्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला एक चमत्कार दाखवतो. असे म्हणून एकाच्या हातात खडा दिला आणि तो खडा टाकून द्यायला सांगताच हातचलाखी दाखवून त्यातून एक रुद्राक्ष काढून दिला. त्या नंतर त्या पंडिताने भिमा जाधवर यांच्या हातातील ५ ग्रॅम वजनाची २४ हजार रु. किंमतीची अंगठी काढून ती एका गमजा मध्ये झाकून ठेवायला सांगून दहा मिनिटा नंतर उघडून बघ. असे सांगितले. त्या नंतर भीमा जाधवर यांनी गमजा मध्ये ठेवलेली अंगठी पाहिली असता त्यांची अंगठी गायब झाली होती. तसेच त्याच वेळी ते दोन अनोळखी इसम देखील गायब झाल्याचे आढळून आले. त्या नंतर भीमा जाधवर यांनी ही माहिती केज पोलिस ठाण्यात दिली.

त्या नंतर प्राथमिक तपास केल्या नंतर भीमा जाधववर यांच्या तक्रारी वरून दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दोन अज्ञात भामट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ५५/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२), ३१८, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू वाघमारे हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts