Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

दोघांना मारहाण ; सरपंचासह सहा जणांवर गुन्हा

Updated: डिसेंबर 11, 2025

By Vivek Sindhu

संमतीशिवाय शेतातून नेली पाईपलाईन; जेसीबीमुळे पिकाचे दीड लाखांचे नुकसान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – ग्रामपंचायतीने केलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या अनुषंगाने पंचनामा करण्यास आलेल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमोर सरपंच व त्याच्या इतर पाच साथीदारांनी दोघांना काठीने व लाथाबुक्याने बेदम मारहाण करीत एकाचा हात फॅक्चर केल्याची घटना सुकळी (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी सरपंच व इतर पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सुकळी (ता. केज) येथे ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या अनुषंगाने पंचनामा करण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल चौरे, जि. प. बांधकाम उपविभागचे शाखा अभियंता संघरक्षित हातागळे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी हे ८ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता गावात आले होते. हे अधिकारी गावातील भास्कर महादु जावळे यांचे घराचे जवळील नाली बांधकामाची पाहणी करीत असताना त्याठिकाणी अमर मोहनराव गायकवाड, विनोद विलास काटकर, शाहु रघुनाथ गायकवाड, अमोल विनायक गायकवाड हे गेले. तर त्या ठिकाणी सरपंच नितीन साहेबराव गायकवाड, रविराज उत्तम खाडे, अक्षय बालासाहेब गायकवाड, प्रविण बळीराम भिशे, अनिकेत जिवनराव गायकवाड, प्रदिप बळीराम भिशे, ज्ञानेश्वर विक्रम गव्हाणे आले. त्यांच्यामध्ये कचरा कुंडीबाबत बोलणे चालू असताना सरपंच नितीन गायकवाड याने अमोल गायकवाड यास तुझा काय संबंध नाही असे म्हणत अंगावर धावून मारहाण करू लागले. तेवढ्यात अमर गायकवाड हे त्यास मारू नको म्हणत सोडवण्यास गेले सरपंच नितीन गायकवाड, अक्षय गायकवाड, प्रदीप भिशे या तिघांनी काठीने अमर गायकवाड याच्या हातावर, डोळ्याजवळ, पाठीत, खांद्यावर, पायाच्या पोटरीवर मारहाण करीत गंभीर जखमी केले. यापुढे गावातील भ्रष्टाचार संबंधाने पुन्हा कोठे आवाज काढला, वरच्या ऑफिसला तक्रारी केल्या तर तुम्हाला जिवे मारून टाकू धमक्या दिल्या. अमर गायकवाड याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सरपंच नितीन गायकवाड, अक्षय गायकवाड, प्रदीप भिशे, रविराज खाडे, अनिकेत गायकवाड, ज्ञानेश्वर गव्हाणे या सहा जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार भारत बर्डे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts