Breaking

चौसाळा बसस्थानकाचे काम रखडले; प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

Updated: June 18, 2025

By Vivek Sindhu

चौसाळा बसस्थानकाचे काम रखडले; प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

WhatsApp Group

Join Now

प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याने संतापाची लाट‎

चौसाळा – चौसाळा येथील बसस्थानकाच्या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे प्रवाशांन बसस्थानकाअभावी उन्हाळ्यात उन्हामध्ये तळपत बसची प्रतिक्षा करावी लागली आहे. तर आता पावसाळ्यात पावसात भिजत थांबावे लागणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील निवाऱ्याची दुरावस्था झाली असून यामुळे प्रवशांची होत असलेली गैरसोय पाहुन चौसाळा येथील नागरीकांमध्े प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.

चौसाळा व पंचक्रोशीतील नागरीकांसाठी सोयीचे ठरणाऱ्या चौसाळा येथील बसस्थानकाच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजुर करावा अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. अनेकवर्ष सदरील मागणीचा पाठपुरावा केला असता शासनाने चौसाळा बसस्थानकासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या कामाची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्याच प्रमाणे कामासह सुरुवात झाली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ व सबंधीत कंत्राटदार या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मागील आठ दिवसांपासून बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. दरम्यान मजुरांअभावी हे बांधकाम रखडले असल्याचे सांगितल्या जात आहे. प्रशासनाने बसस्थानकाच्या बांधकामास गती द्यावी अशी मागणी प्रवशांकडून केली जात आहे.

लिलावाअभावी लाकडांचा ढिगारा पडून बसस्थानक बांधकामासाठी परिसरातील झाडे तोडून लाकडांचा ढिग मारण्यात आला होता॰. सदरील लाकडांचा वापर व्हावा या दृष्टीने प्रशासनाने त्याचा लिलाव करणे अपेक्षीत होते. परंतु अद्यापही लिलाव न झाल्योन सदरील लाकडे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यातील ७५ टक्के लाकडांची चोरी झाली असल्याचे दिसुन येत आहे.