Breaking
Updated: जानेवारी 16, 2026
एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – पत्नीला नळाचे पाणी घेण्यावरून का बोललीस अशी विचारणा करणाऱ्या भावास बहिणीने धरून ठेवले. तर मेव्हण्याने स्टूल डोक्यात मारून डोके फोडले. भाच्याने दगड पाठीत मारून लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना केज शहरात घडली.
केज शहरातील टिपू सुलतान चौक भागातील अमय इब्राहिम कुरेशी (वय ४०) यांच्या शेजारी त्यांची बहीण आलिशान खयूम अन्सारी ही वास्तव्यास आहे. १३ जानेवारी रात्री १० वाजता अमय हे त्यांच्या पत्नी नळाचे पाणी भरण्यावरून का बोललीस अशी विचारणा त्यांची बहीण आलिशान हिस करीत होते. याचवेळी आलिशान हिने धरून ठेवले. तर मेव्हणा खयुम अन्सारी याने लोखंडी स्टुल डोक्यात मारुन जखमी केले. तर भाचा आदम अन्सारी याने त्यांना खाली पाडून दगड पाठीत, छातीत मारून लाथाबुक्यांनी व चापटांनी मारहाण करीत मुक्कामार दिला. परत घरी आलास तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. अशी तक्रार अमय कुरेशी यांनी दिल्यावरून आलिशान अन्सारी, खयूम अन्सारी, आदम अन्सारी या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक त्रिंबक सोपणे करीत आहेत.