Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

आडस उपकेंद्रात १० एमव्हीएचे नवीन रोहित्र दाखल; आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश

Updated: जानेवारी 18, 2026

By Vivek Sindhu

615337607 26583924821207606 2400388334190655081 n

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: आडस येथील ३३ केव्ही उपकेंद्रात आज अखेर ३३/११ केव्ही, १० एमव्हीए क्षमतेचे नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) दाखल झाले आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, यामुळे आडस पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आता शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा मिळणे शक्य होणार आहे.

गेल्या काही काळापासून आडस परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि शेतीकामासाठी पुरेसा वीजपुरवठा मिळण्यात अडचणी येत होत्या. ही समस्या सोडवण्यासाठी आमदार मुंदडा यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. वाढत्या विजेच्या मागणीचा विचार करता, या उपकेंद्राची क्षमता वाढवणे गरजेचे होते. त्यानुसार नवीन उच्च क्षमतेचे रोहित्र मंजूर करून घेऊन ते प्रत्यक्षात दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या नवीन रोहित्रमुळे वीज पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर होऊन अधिक दाबाने आणि सातत्याने वीज उपलब्ध होणार आहे. विशेषतः दिवसा वीज मिळणार असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांचा त्रास आता कमी होणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील सिंचन व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts