Breaking

नेकनूरमध्ये सव्वा चार लाखांची अल्युमिनियम तार लंपास

Updated: ऑगस्ट 26, 2025

By Vivek Sindhu

नेकनूरमध्ये सव्वा चार लाखांची अल्युमिनियम तार लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नेकनूर : तालुक्यातील लोणी घाट शिवारातील राणूबाई मंदिर परिसरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांच्या अल्युमिनियम तारांची चोरी केली. या घटनेने वीजपुरवठा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

आण्णा इंटरप्रायजेसचे व्यवस्थापक शिवराज दिगांबर कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 13 जुलैच्या रात्री 11 वाजल्यापासून 14 जुलैच्या सकाळपर्यंत मौजे लोणी घाट शिवारात पंडित जाधव यांच्या पॉल्ट्री फॉर्म व टेंभी टेकाड परिसरातील लोखंडी पोलवर लावलेली वीज लाईन चोरीस गेली. ओ.टू. पॉवर कंपनीच्या ३३ के.व्ही. ट्रान्समिशन डॉग लाईनवरील २५ पोलांवरून अंदाजे २.८ किमी लांबीची जुनी अल्युमिनियम तार चोरून नेण्यात आली. चोरी गेलेल्या तारांची किंमत अंदाजे ४ लाख २५ हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पो.ह. मुरुमकर करीत आहेत.


Categories

Recent Posts