Breaking
Updated: डिसेंबर 16, 2025
रोटरी क्लब व ग्राम ऊर्जा फाउंडेशन च्या वतीने महिला मेळावा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: नवनिर्मितीला चालना देणारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण महिला बचत गटांना उपलब्ध करून दिले जाईल. तसेच उत्पादनाचे प्रदर्शन व बाजारपेठ उपलब्धीसाठी रोटरी पुढाकार घेईल.असे प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल सुधीर लातुरे यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, ग्राम ऊर्जा फाउंडेशन,यूथ एड, पुणे, डॉ के.आर.श्रॉफ फाउंडेशन व सृजन अॅग्रो टेक प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने महिला उद्योजकता घेण्यात आला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातुरे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विलास तरंगे,
उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, दादासाहेब गायकवाड (अध्यक्ष, ग्राम उर्जा फाऊंडेशन अंबाजोगाई)रोहीणी पाठक (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी),रोहीणी भरड (कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई) विलास जगताप (माविम),सूर्यभान जाधव (कोरो इंडिया फेलो) यांच्यासह ग्राम ऊर्जा फाउंडेशनचे सचिव अशोक हातागळे, वैजिनाथ इंगोले रोटरी चे उमेश तापडिया, संगीता लातुरे यांची उपस्थिती होती.
या मेळाव्यात अंबाजोगाई तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधील सुमारे २०० महिला उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मेळाव्यात महिलांनी स्वतः तयार केलेल्या अन्नप्रक्रिया, कृषीपूरक व हस्तकला उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ग्राम ऊर्जा फाउंडेशनमार्फत उपलब्ध रोजगार, उद्योजकता विकास, प्रशिक्षण व शासकीय योजना संदर्भातील सेवांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. यावेळी महिला उद्योजकांनी आपल्या उद्योग विषयक संकल्पना व लागणारी मदत
याची माहिती विषद केली.
शीला कुणाल जोगदंड, सुरेखा कुंडगर, सुरेखा कचरे, सरस्वती नखाते राजेश्वरी सूर्यवंशी, आरती दहीवाड यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब गायकवाड यांनी केले.
संचालन संजिवनी गुळभीले यांनी तर उपस्थितांचे आभार शामल राउत यांनी मानले.