Breaking

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तेलंगणातून आरोपी ताब्यात

Updated: सप्टेंबर 14, 2025

By Vivek Sindhu

images 2025 09 14T174648.646

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : तालुक्यातील १६ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तेलंगणातून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पीडित मुलीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

३० मे रोजी रात्री इयत्ता १२ वी शिकणारी पीडिता नातेवाईकांसह झोपलेली असताना अज्ञाताने तिचे अपहरण केले. केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मात्र तीन महिन्यांपर्यंत मुलगी व आरोपींचा मागोवा लागत नव्हता. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार उमेश निकम यांनी तपास सुरू ठेवला. संशयित हर्षद बालाजी जाधवर (वय २०) याच्यावर लक्ष केंद्रित करून त्याच्या नातेवाईकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. लोकेशन तेलंगणा राज्यात आढळून आल्यानंतर फौजदार उमेश निकम, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, किशोर गोरे व जमादार जयश्री भालेराव यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने खम्मम जिल्ह्यातील मोडीगोंडा येथून आरोपीला अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले.

हर्षद जाधवर याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके करत आहेत.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने नैराश्यात गेलेल्या तिच्या पित्याने ३ सप्टेंबर रोजी दुपारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts