Breaking
Updated: June 12, 2025
WhatsApp Group
Join Nowखा.बजरंग सोनवणेंनी दिला शेतकऱ्याला धीर, लागेल ती मदत करण्याचाही शब्द
बीड: बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं फळबागधारक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अशाच एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत असताना त्याने थेट खासदार बजरंग सोनवणे यांना फोन लावला. यावेळी खा.सोनवणे यांनी लागेल ती मदत करतो, असे आश्वासन दिले. तसेच काही चुकीचे पाऊल उचलू नका अशी विनंती केली होती. लेकराबाळांचा विचार करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन देत या शेतकऱ्याला धीर दिला आहे.
बीड जिल्ह्यात मे महिन्यात चांगला पाऊस झाला असून यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही झालेले आहे. शिवाय मागील वर्षी शेतीचे नुकसान झाल्याने यावर्षी पेरणी कशी करायची, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहेत. याच चिंतेत असलेले अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी अशोक गाढवे यांच्या मनात अनेक विचार येऊ लागले. अशातच त्यांनी चुकीचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करताना त्यांनी मदन परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याना चुकीचे पाऊल उचलता आले नाही. यानंतर त्यांनी तातडीने खा.बजरंग सोनवणे यांना फोन केला. यानंतर गाढवे हे रडू लागले. यामुळे खा.सोनवणे यांनी तुम्ही रडू नका, काय झाले आहे ते सांगा असे म्हणत सर्व हकीकत एैकून घेतली. यावेळी गाढवे हे चिंतेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे खा.सोनवणे यांनी लेकराबाळांचा विचार करा, कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. तुम्हाला शासन स्तरावरून करता येईल ती मदत करूच पण त्याही पुढे जावून तशी मदत मिळाली नाही, तर मी आपल्याला वैयक्तिक मदत करेल. आपण स्वतला सावरावे, अशी विनवणी करत शेतकऱ्यास धीर दिला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेला शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या शेतकऱ्याला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन सोनवणे यांनी दिले आहे. शेतकऱ्याशी संवाद साधल्याची खासदार सोनवणे यांची ऑडिओ क्लिप हायरल झाली असून शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटूंबियांची भेट घेणारे पुढारी एकीकडे आणि शेतकऱ्यांना जीवंतपणी मदत करण्यासाठी प्रयत्न करणारे खा.बजरंग सोनवणे हे खरे शेतकरीपुत्र असल्याचे यातून दिसत आहे.