Breaking
Updated: June 13, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज – दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या न्यायालयीन समितीच्या सदस्यपदी काँग्रेसच्या राज्यसभा खा रजनीताई अशोकराव पाटील यांची निवड झाली. राज्यसभेच्या अध्यक्षांनी सदस्यत्वाचे मानांकीत केले आहे. जगातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी महत्वाच्या आणि वैचारीक म्हणून ओळख असलेल्या जेएनयू विद्यापीठाच्या न्यायालयीन सदस्यपदावर खा रजनीताई पाटील,डॉ.सुधांशू त्रिवेदी, डॉ. सस्मित पात्रा ,डॉ. अशोक कुमार मित्तल आदींची निवड करण्यात आली आहे. समिती समन्वय विभागाचे महासचिव पी सी मोडी यांनी याबद्दल अभिनंदन केले आहे.
जे एन यु विद्यापीठात माझे शिक्षण झाले त्याच विद्यापीठाच्या न्यायालयीन समितीवर काम करण्यास विशेष आनंद आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काम करत राहणार असल्याचे खा पाटील यांनी सांगितले.