Breaking
Updated: June 4, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज – केज येथे माहेश्वरी समाज बांधवानी महेश जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण करीत रक्तदान शिबिर घेतले.
केज शहरातील क्रांतीनगर भागातील माहेश्वरी समाजाच्या स्मशानभूमीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करून ५१ वृक्षांचे रोपण करण्यात आले.
त्याचबरोबर वकीलवाडी भागातील हनुमान मंदिरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते व तेलंगणाच्या श्यामबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सतीश जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी माहेश्वरी सभेचे तालुकाध्यक्ष मनीष जाजू म्हणाले की, ३ वर्षांपासून अशा प्रकारचे उपक्रम घेतले असून भविष्यात ही असे समाजोपयोगी राबवू. अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाला माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश भुतडा, जेष्ठ नागरिक संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर जाजू, किशन जाजू, सुरेश सोनी, सतीश काकानी, राजू जाकेटिया, विष्णू लोहिया, श्याम जाजू, आनंद काकानी, संतोष बियाणी, सुनील तापडिया, दिलीप भुतडा, संतोष तोष्णीवाल, चंद्रप्रकाश बियाणी, हरिप्रसाद सोनी, सत्यम मंत्री, संतोष रिणवा, विष्णू जाजू, रमेश बाहेती, मंगल भन्साळी, रमा रिनवा, शोभा भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती.