Breaking
Updated: June 4, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज – भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील केज पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण कुंडलिक घुले (वय ७५) यांचा डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील मधुबन हॉटेलजवळ मंगळवारी (दि. ३) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.
टाकळी (ता. केज) येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण कुंडलिक घुले (वय ७५) हे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या शहरापासून जवळच असलेल्या बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरातील घरीहून दुचाकीवर शहराकडे निघाले होते. त्यांची दुचाकी ही केज – मांजरसुंबा रस्त्यावर आली असता मांजरसुंब्याकडून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातात दुचाकीवरील नारायण घुले यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कार चालक कारसह फरार झाला असून कारचा नंबर घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मृतदेह उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला असून बुधवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून त्यांच्या पार्थिवावर टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.