Breaking
Updated: May 29, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस आधिकार्यांच्या अखेर बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून अनेक अधिकारी बाहेर जिल्ह्यात गेले असून काही अधिकारी त्यांच्या जागी बीड जिल्ह्यात येतं आहेत.
बीड जिल्ह्यातून बदली झालेल्या अधिकार्यांमध्ये पीएस आय राजेश पाटील छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, रामेश्वर इंगळे छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, बसवेश्वर छानशेट्टी धाराशिव, शिवाजी सर्जे धाराशिव, स्वप्निल भुजगुडे धाराशिव,शिला सोमवंशी धाराशिव, निशिगंधा खुळे धाराशिव, प्रमोद यादव छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, राहुल पतंगे धाराशिव,वैभव सारंग छात्र पती संभाजी नगर ग्रामीणला गेले आहेत
. तर रमेश घुले धाराशिव वरून बीड, प्रदीप ठूबे बीड,धाराशिव वरून पवन निबाळकर बीड ला येणार आहेत.पोलीस निरीक्षक मध्ये बीडवरून संतोष साबळे जालना, प्रशांत महाजन छत्रपती संभाजी नगर ग्रामीण,संतोष घोडके जालनाला गेले तर कस्तुरे यांना एक वर्ष मुदतवाढ मिळा आहे.
तर बाहेर जिल्ह्यातून पीआयमध्ये छत्रपती संभाजी नगर वरून किशोर पवार बीड,रमेश जायभाये जालना वरून बीड तर मुरलीधर खोकले छत्रपती संभाजी नगरवरून बीड ला आले आहेत. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक यामध्ये बीडमधून चंद्रशेखर पवार छत्रपती संभाजी नगर ग्रामीण,संतोष मिसळे छत्रपती संभाजी नगर ग्रामीण,विजयसिंग जोनवाल छत्रपती संभाजी नगर ग्रामीणला गेले तर महेंद्र ठाकूर यांना 1 वर्ष मुदतवाढ तर महेश क्षीरसागर धाराशिव वरून बीड ला येतं आहेत.
दरम्यान रिक्त झालेल्या ठाणेदारांच्या जागी आता पोलीस अधिक्षक कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्वाच्या ठिकाणी ही अधिकारी देणे बाकी असून पोलीस अधिकार्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज उद्यामध्येच बीडमधील अधिकार्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा व्हायला हवा अशी शक्यता आहे. दरम्यान काही ठाणेदारांच्या कारभारावर नाराजी असल्यामुळे त्यांची उचलबांगडी होणार असून त्यांच्या जागी कोणाला संधी मिळते हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.