Breaking
विविध खात्याचे विभागप्रमुख उपस्थित राहणार
बीड: जिल्ह्यात विविध योजनांतर्गत विकास कामे सुरू असून त्यांचा आढावा घेण्यासाठी दि.३० जून रोजी दुपारी ३ वाजता खा.बजरंग सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित केली आहे. या बैठकीत खा.बजरंग सोनवणे हे विविध विकास कामांना दिशा देण्याचे काम करणार आहेत.जिल्हा विकास समन्वय समिती व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक आयोजीत केलेली आहे. मागील बैठकीत खा.सोनवणे यांनी विविध विकास कामांचा आढावा घेताना विकास कामांना गती देण्याच्या सुचना दिल्या होत्या. यानंतर आता दि.३० रोजी दिशा समितीची बैठक आयोजित केली असून मागील आठ दिवसांपासून जिल्हा प्रशासनातील अधिकारी या बैठकीची तयारी करत आहेत. दरम्यान, खा.बजरंग सोनवणे हे ग्राम पातळीपासून सर्व अनुभव असलेले नेतृत्व असून त्यांचा जिल्हा परिषदेतील योजनांचा दांडगा अनुभव आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी तो अनुभव पाहता आपल्याकडून काही उणीव राहणार नाही, याची काळजी घेत आहेत. शिवाय आठ दिवसांपासून सर्व माहिती एकत्रित केली जात आहे. दि.३० रोजी दुपारी ३ वाजता या बैठकीला सुरूवात होणार आहे. या बैठकीत सन २०२४-२५ अखेरचा आढावा घेणार आहेत. तर त्याआधी दुपारी १२.३० वाजता जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची, राष्ट्रीय महामार्ग विभागाची तसेच रेल्वे कामांचीही बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीला अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Last Updated: June 28, 2025
Share This Post