Breaking
Updated: जानेवारी 6, 2026
नांदूरघाट महाविद्यालयात करिअर कट्टा व मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – नांदूरघाट (ता. केज) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी करिअर कट्टा व स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन शिवसागर सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. संतोष सावरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य डॉ. शंकर मुंडे यांनी आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात सर्व विद्यार्थ्यांनी टिकून राहण्यासाठी अभ्यास आणि कष्ट करून यश मिळविले पाहिजे. असे सांगून त्यांनी स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन केले. करिअर कट्टा व स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. जितेंद्र घोडके यांनी महाराष्ट्र राज्य व व उच्च शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने करिअर कट्टा मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आयएएस आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला त्याचबरोबर लोकसेवा आयोग, पोलीस भरती अशा विविध कार्यक्रमाचा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. असे सांगितले. तर महाविद्यालयातील प्रा. डॉ. शंकर सावरगावकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधाकर हंगे यांनी तर आभार प्रा. डॉ. बाळासाहेब जाधव यांनी मानले.