Breaking
Updated: June 7, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupबीड – वडवणी पोनीस ठाण्याच्या समोरच हाकेच्या अंतरावरच माफियाने गुटख्याचे गोदाम केले. तरी देखील वडवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती. परंतू स्थानिक गुन्हे शाखेने याची माहिती काढून शुक्रवार (दि.६) रोजी दुपारी कारवाई केली. यात एकाला ताब्यात घेत तब्बल साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अरविंद सुबिव म्हस्के (रा. बाहेगव्हाण ता. वडवणी) असे पकडलेल्या गुटखा माफियाचे नाव आहे. त्याचे पोलीस ठाण्यापासून साधारण ५०० मिटर अंतरावरच किराणा दुकान आहे. याच दुकानात त्याने गुटख्याचा साठा केला होता. मागील अनेक दिवसांपासून तो गुटख्याची विक्री करत होता. परंतू वडवणी पोलिसांना याची कसलीही खबर नव्हती. परंतू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही माहिती काढली. शुकवार (दि.६) रोजी दुपारी कारवाई केली. यात त्यांनी तब्बल साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, हवालदार राजु पठाण, महेश जोगदंड, राहुल शिंदे, बप्पासाहेब घोडके, अर्जुन यादव, चालक गणेश माराडे आदींनी केली