Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सारणी तलावातील लाखों रुपयाची केबल वायर चोरीस

Updated: फेब्रुवारी 4, 2026

By Vivek Sindhu

सारणी तलावातील लाखों रुपयाची केबल वायर चोरीस

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – सध्या शेतातील पिकांना पाण्याची आवश्यकता लागत असून या पिकांना पाणी देण्यासाठी सारणी सांगवी तलवामध्ये शेतकऱ्यांच्या मोटार पंप चालू असतात. परंतु तलावातील कार्यरत असणाऱ्या सर्वच मोटारीचे लाखो रुपयांची केबल वायर चोरांनी चोरून नेली त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे.

केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील तलावा मध्ये सारणी, सांगवी, पिंपळगाव, जोला, सारोळ यासह शेजारच्या गावात तील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, ज्वारी सह इतर रब्बी पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी या तलावामध्ये मोटारी टाकून पिकांना पाणी देण्यात येत आहे. या तलावामुळे अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भागत असतो. परंतु या शेतकऱ्यांच्या मोटार पंपाच्या केबलची लाखो रुपयांची केबल वायर चोरांनी चोरून नेली असून शेतकऱ्यावर ही हजारो, लाखो रुपयांची वायर चोरी गेल्यामुळे आर्थिक भूृर्दंड सोसण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. या तलावातील केबल वायरचे चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही परिसरातील शेतकरी करीत आहेत. त्यामुळे या चोरांना जेरबंद करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

चुकट…..
या तलावामाध्ये सातत्याने केबल चोरीचे प्रमाण वाढत आहे. हे केबल अत्यंत महागडे असतात. यावेळी तर २५ शेतकर्यांच्या मोटरीच्या केबल वायर चोरी गेले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांची चोरी झाली.
— काकासाहेब भांगे सारणी


Categories

Recent Posts