Breaking
Updated: एप्रिल 17, 2026
सारनाथ नगर येथे भिम जयंती उत्साहात साजरी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य आज ही प्रेरणादायी आहेत असे मत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंत मरकाळे यांनी व्यक्त केले.
येथील सारनाथ नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. शंकर वाघमारे, पोलिस निरीक्षक शरद जोगदंड तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार हे उपस्थित होते.
आपल्या विस्तारित भाषणात प्रा. डॉ. अनंत मरकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना त्यांच्या सामाजिक राजकीय कार्याचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वच क्षेत्रात उत्तुंग कार्य असून त्यांचे विचार व कार्य आज ही प्रेरणादायी आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रा. डॉ. शंकर वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन पुस्तक वाचून व अभ्यासून समृध्द केले त्याच प्रमाणे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले जीवन पुस्तकांचा आधार घेऊन समृध्द करावे असे आवाहन केले तर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हालखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देवून एक सर्वसामान्य मुलगा ते देशाचा संविधान निर्माता होण्यापर्यंत यशाचे शिखर गाठले. आजच्या तरुणांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा हा आदर्श घेत आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रमाजी सपकाळ यांची आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रथम भेटी पासून त्यांच्या कौटुंबिक स्नेहा पर्यंतच्या आठवणी सांगितल्या. जोतिबा फुले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांची लग्नगाठ बांधलेला संदर्भ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “बुध्द आणि त्यांचा धम्म” या पुस्तकासाठी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या रात्री लिहिलेली प्रस्तावना व पिपल्स एज्युकेशन सोसायटी ने हे पुस्तक छापताना ही प्रस्तावना वगळून पण पुस्तक छापण्याचा घेतलेला निर्णय व त्या संदर्भाची कारणं यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्राचार्य सुर्यवंशी यांनी केले तर प्रा. डॉ. दिपक मस्के यांनी आभार मानले. या कार्यक्रमात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांंना प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. संयोजक डॉ . बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप मस्के व डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत रोडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.