Breaking

बाभळगाव शिवारात जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी विळ्याने मारहाण

Updated: ऑगस्ट 8, 2025

By Vivek Sindhu

बाभळगाव शिवारात जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी विळ्याने मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : बाभळगाव शिवारातील शेतात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका शेतकऱ्यावर लोखंडी विळ्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवार दुपारी घडली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश संभाजी सोनवणे (वय ५१, रा. बाभळगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या गट नंबर ४०७ मधील शेतात असताना आरोपी अंगद संभाजी सोनवणे यांनी जुन्या वादाची केस मिटवून घे, अशी कुरापत काढली. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता लोखंडी विळ्याने डोक्यात मारहाण करत गंभीर जखमी केले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर प्रकाश सोनवणे यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बर्दापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फड करत आहेत.


Categories

Recent Posts