Breaking

बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

Updated: ऑगस्ट 22, 2025

By Vivek Sindhu

बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड –  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या 61  निवडणूक विभाग आणि त्याअंतर्गत  निर्वाचक गणात गेवराई-18, माजलगाव-12, वडवणी-04, बीड-16, शिरुर कासार-08, पाटोदा-06, आष्टी-14, केज-14, धारुर-06, परळी-12 आणि अंबेजोगाई-12 अशा एकूण जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या 122 निर्वाचक गणासाठी  निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

       त्यानुसार आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. ही अधिसूचना बीड जिल्हाधिकारी कार्यालय, बीड जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.


Categories

Recent Posts