Home »
Majalgaon » आठ दिवस पावसाचा खंड; 67 टक्के पेरणी रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त
आठ दिवस पावसाचा खंड; 67 टक्के पेरणी रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त
पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी हतबल; उडीद, मुगाचे क्षेत्र घटणार
माजलगाव – मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी केले त्यामुळे यंदा वेळेत पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मृगनक्षत्रात पावसाने दमदार हजेरीही लावली परंतु त्यानंतर अचानक उघडीप दिल्याने माजलगाव तालुक्यातील पेरणीची कामे थांबली. दरम्यान पावसाची अपेक्षाठेवत अनेक शेतकऱ्यांनी काहीअंशी पेरणी उरकली असुन गुरुवार (१९ जून) अखेर माजलगाव तालुक्यात ३३ टक्के पेरणी झाली असुन अद्यापही ६७ टक्के पेरण्ी शिल्लक आहे. जनु महिना संपत आला तरी पेरणी झाली नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पाऊस पडावा यासाठी आकाशाकडे डोळे लावून शेतीतील राहिलीसायली कामे पुर्ण करीत आहेत.
माजलगाव तालुक्यात ७८ हजार ७७८ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असुन यापैकी ६० ते ६५ हजार क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. त्यापैकी ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पुर्ण झाली असुन अद्यापही ६७ टक्के क्षेत्र रिकामे आहे. पेरणी वेळेत झाली तर पिकांची उत्पादकता खरिपाच्या दृष्टीने चांगली राहिल. विशेषत: मृगनक्षत्रातील पावसाचा मुग, उडीद, कापूस, सोयाबीन या पिकांना चांगला फायदा होतो. परंतु पाऊसच पडत नसल्याने यंदाही उडीद, मुग व इतर तृणधान्य पिकांच्या पेरणीचे प्रमाण घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुन महिना संपता आला तरी पेरणी पुर्णपणे झाली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनले आहेत. हजारो रुपयांचा खर्च करु खत, बियाणे, किटकनाशके खरेदी केली आहेत. परंतु पेरणी योग्य पाऊसच पडला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने लावगड केलेल्या पिके जगावीत यासाठी शेतकरी पिकांना पाणी देण्याचे काम करीत आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यासच पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले असुन आद्रा नक्षत्रात पाउस पडेल अशी अपेक्षा आहे. मागे पडलेल्या पावसावर पेरणी केली परंतु आता पाउस कधी पडणार? असा प्रश्न आहे. अशी भावना माजलगाव तालुक्यातील शेतकरी विश्वनाथ कांबळे यांनी व्यक्त केली आहे. माजलगाव तालुक्यात पावसाने उघडीप मारल्याने पेरणी रखडली असुन ओलावा असलेल्या जमिनीत शेतकरी पाऊस पडण्याच्या आशेवर पेरणी करीत आहेत.
पिकनिहाय झालेली पेरणी कापुस १२ हजार ५००, सोयाबीन ७ हजार ५००, तुर २४०, मुग ८५, एकुण २० हजार ३२५ हेक्टरवर पेरणी पुर्ण झाली आहे. दरम्यान येत्या काळात चांगला पाऊस होवून शंभरटक्के पेरणी होईल्. अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Last Updated: June 20, 2025
About Author
विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.
Share This Post