Breaking

हातभट्टी दारू विक्रेत्याची एमपीडीए अंतर्गत कारागृहात रवानगी

Updated: July 3, 2025

By Vivek Sindhu

InShot 20250703 222154818

WhatsApp Group

Join Now

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. हातभट्टीची दारू तयार करून तिचा चोरटा व्यापार करणाऱ्या ईब्बु काशीम नुरीवाले (वय ३४, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) या इसमावर महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत कठोर कारवाई करत त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हसुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी दिनांक ३१ मे २०२५ रोजी सदर इसमाविरोधात स्थानबद्धतेसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक ३० जून २०२५ रोजी एमपीडीए अंतर्गत आदेश काढत ईब्बू नुरीवाले यास कारागृहात ठेवण्याचे आदेश पारित केले.

सदर इसमाविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे नोंद असून त्यातील ७ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत व २ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. यापूर्वीही त्याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार प्रतिबंधक कारवाई झाली होती. मात्र, त्या कारवाईकडे दुर्लक्ष करून तो पुन्हा हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता.

दिनांक १ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक स्थागुशा बीड शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सदर इसमाला ताब्यात घेऊन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवाना करण्यात आले.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे, अभिमन्यु औताडे, पोह/कल्याण देशमाने, महेश भागवत, बापू राऊत, जयदीप कसबे आदींनी सहभाग घेतला.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी भविष्यातही अवैध दारू, वाळू तस्करी, गुटखा विक्री, काळाबाजार, जाती-धर्मावरून तेढ निर्माण करणारे, खंडणी व दहशत माजवणाऱ्या गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.