Breaking
Updated: July 3, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड – बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण, पीसीपीएनडीटी, फ्लोरेसीस, मौखिक आरोग्य या आरोग्य विभागांच्या कार्यक्रमांसह, रुग्ण कल्याण समिती, १०८ रुग्णवाहिका, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य, आयुष्यमान भारत आदी योजना, आरोग्य विभागाकडून रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात हा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचनाही केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेशकुमार माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमृता मुळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुहास कुलकर्णी आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत व डॉ. गंडाळ यांनी आरोग्य विभागांतर्गत सेवा देण्यात असलेल्या विविध सेवांचा तपशील यावेळी सादर केला. आरोग्य सेवा देत असलेले सर्व कार्यक्रम प्रमुख यांनी आपापल्या विभागातील कामकाजांबाबत सविस्तर माहिती सादर केली.