Breaking
Updated: ऑगस्ट 8, 2025
रोटरी क्लबच्या वतीने स्तनपान सप्ताह साजरा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – आईच्या दुधाने बाळाचा बौद्धिक विकास तर होतोच. पण त्याचबरोबर त्याची प्रतिकारशक्ती देखील वाढते. आणि म्हणूनच या मातेच्या दुधाला पहिली लस असे देखील संबोधले जाते. असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉ.स्वाती अतुल शिंदे यांनी केले.
लोखंडी सावरगाव येथील स्त्रीरुग्णालयात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने”स्तनपान जनजागृती व स्तनदा माता बालकांचे आरोग्य या एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर” आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.स्वाती शिंदे बोलत होत्या. यावेळी मंचावर स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण,
डॉ.चंद्रकांत चव्हाण, मार्गदर्शक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चेतन आदमाने,रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, उपाध्यक्ष धनराज सोळंकी,सचिव मंजुषा जोशी , स्वरूपा कुलकर्णी, डॉ.अलका तडकलकर , गीता कुलकर्णी , योग शिक्षिका मंदाकिनी गीते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना स्वाती शिंदे म्हणाल्या की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला काही वेळानंतर पहिल्यांदा आईचेच दुधपाजले पाहिजे. कारण तेच त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु, आजकालच्या महिला त्या विसरत चालल्या आहेत की काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या प्रसंगी बोलताना डॉ. चंद्रकांत चव्हाण म्हणाले की
नवजात बाळांचे आरोग्य आणि मातांचे पोषण यांचा गाभा असलेले स्तनपान हे केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया नसून, नव्या पिढीचे आरोग्यदायी भविष्य घडवणारे शक्तिशाली माध्यम आहे.स्तनपानाबाबत अजूनही समाजात काही गैरसमज, माहितीअभावी चुका आणि अज्ञान आहेत. हे दूर करताना डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि सामाजिक संस्थांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. म्हणूनच, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने. हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रा.रोहिणी पाठक यांनी महिलांना प्रश्नोतरातून “आईच्या दुधाची बँक” या उपक्रमा बाबत जनजागृती केली.यावेळी डॉ.चेतन आदमाने यांनीही स्तनदा मातांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख स्वरुपा कुलकर्णी यांनी केले. संचलन सीमा पार्डीकर. यांनी तर उपस्थितांचे आभार सचिव मंजुषा जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.