Breaking

जिवाचीवाडी येथे एका विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Updated: फेब्रुवारी 27, 2026

By Vivek Sindhu

विवाहित महिलेचा छुपा पाठलाग करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे भरधाव मोटार चालविणाऱ्या युवकाने एकाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील बालासाहेब पांडुरंग शिंदे ही दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास तुकुचीवाडी येथील रोडवर उभे होते. त्या वेळी त्यांच्या गावातील आसाराम महादेव फुंदे हा त्याचे मोटार सायकल भरधाव वेगात चालवत त्याच्या जवळ आला. त्याने बालासाहेब शिंदे यांच्या पाया जवळ मोटार सायकल माझ्या पायाचे जवळ उभा केली. त्यामुळे बालासाहेब शिंदे त्याला म्हणाले की, “गाडी जरा शिस्तीत चालव.”  असे म्हणाताच आसाराम फुंदे याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच गळ्यातील गमजाला पकडुन खाली पाडले. त्यामुळे बाळासाहेब शिंदे डोक्यास उजव्या बाजुला मार लागला. तसेच त्याने मानेवर पाय देवुन दोन्ही हात मागे ओढुन पिरगाळले. त्या नंतर आसाराम फुंदे हा बालासाहेब शिंदे यांना मारण्यासाठी दगड उचलत असताना ते उठुन घराकडे पळत जात असतांना त्याने दोन्ही हातामध्ये दगडे घेवुन आडवा आला. तसेच त्याने बालासाहेब शिंदे यांची पत्नी हिला पण जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी बालासाहेब शिंदे यांच्या तक्रारी वरून आसाराम शिंदे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ९०/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ३५१(२), ३५२ यासह ॲट्रॉसिटीचे कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्ही ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts