Breaking

शेतातील ५० हजारांचा सोलर पंप चोरट्यांनी केला लंपास; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: जून 25, 2026

By Vivek Sindhu

शेतातील ५० हजारांचा सोलर पंप चोरट्यांनी केला लंपास; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: शहरातील नागझरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील ५० हजार रुपये किमतीचा सोलर पंप आणि मोटर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे परळी तालुक्यातील वाघाळा येथील रहिवासी असलेले आनंद गंगाधर (वय ४०) हे सध्या अंबाजोगाईतील नागझरी परिसरातील सारनाथ नगर येथे राहतात आणि खाजगी नोकरी करतात. नागझरी परिसरात त्यांची शेती असून त्यांनी शेतातील तळ्यावर ३ एच.पी. क्षमतेचा ‘रोटोसोल’ कंपनीचा ५० हजार रुपये किमतीचा सोलर पंप आणि मोटर बसवली होती. २१ जून २०२६ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हा सोलर पंप आणि मोटर चोरून नेली. २४ जून रोजी दुपारी पावणेबारा वाजता या चोरीच्या घटनेची अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गित्ते करत आहेत.


Categories

Recent Posts