Breaking
Updated: जून 25, 2026
ऊसतोडणीच्या उचल पैशांवरून पिता-पुत्राला लोखंडी कवचाने बेदम मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तालखेड फाटा येथील एका चायनीज हॉटेलसमोर ऊसतोडणीच्या उचल पैशांच्या वादातून पिता-पुत्राला लोखंडी कवचाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिलीप राजू राठोड (रा. मारगादेवी तांडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब सुभाष चव्हाण आणि राहुल सुभाष चव्हाण (दोघे रा. जायकवाडी तांडा, माजलगाव) यांच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप राठोड हे शेती व ऊसतोडणी मजूर म्हणून काम करतात. २० मे २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालखेड फाट्यावरील युवराज चायनीज हॉटेल येथे ऊसतोडणीच्या उचलीच्या पैशांवरून आरोपींशी त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी भाऊसाहेब चव्हाण याने फिर्यादी दिलीप यांच्या डाव्या खांद्यावर लोखंडी कवचाने मारहाण करून मुकामार दिला. तर दुसरा आरोपी राहुल चव्हाण याने दिलीप यांच्या वडिलांच्या छातीवर आणि पोटावर लोखंडी कवचाने प्रहार करून गंभीर दुखापत केली. दोन्ही आरोपींनी पिता-पुत्राला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. वैद्यकीय कायदेशीर अहवाल (MLC) प्राप्त झाल्यानंतर २४ जून रोजी रात्री उशिरा या प्रकरणाची पोलिसात अधिकृत नोंद झाली असून महिला पोलीस अंमलदार मस्के या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.