Breaking

मामांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला लोखंडी वस्तूने मारहाण

Updated: जून 25, 2026

By Vivek Sindhu

शेतातील ५० हजारांचा सोलर पंप चोरट्यांनी केला लंपास; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: तालुक्यातील मानेवाडी येथे पैशांच्या व्यवहारावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका २९ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २३ जून २०२६ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास मानेवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी जखमी तरुण सुशील बालासाहेब वगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय उर्फ सचिन प्रकाश माने (रा. मानेवाडी, ता. केज) याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशील वगरे यांचे मामा शिवाजी माने आणि संतोष माने यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. यावेळी आरोपी विजय माने देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. वाद विकोपाला गेल्याने सुशील हे आपल्या मामांचे भांडण सोडवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी तिथे गेले. याचा राग मनात धरून आरोपी विजय याने सुशील यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने सुशील यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि डाव्या हातावर गंभीर इजा करून जखमी केले. २४ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता या घटनेची पोलिसात अधिकृत नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार सय्यद या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts