Breaking

पाटोदा-बीड रस्त्यावर ऊसतोड कामगाराला कोयत्याने मारहाण करत लुटले

Updated: जून 25, 2026

By Vivek Sindhu

पाटोदा-बीड रस्त्यावर ऊसतोड कामगाराला कोयत्याने मारहाण करत लुटले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: पाटोदा ते बीड जाणाऱ्या रस्त्यावरील रोहतवाडी ते थेरला शिवारात एका ४१ वर्षीय ऊसतोड कामगाराला अज्ञात तीन जणांनी अडवून कोयत्याने जीवघेणी मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकारणी राजेंद्र अभिमान नागरे (रा. थेरला, ता. पाटोदा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(७), ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र नागरे हे शेती आणि ऊसतोडणीचा व्यवसाय करतात. २२ जून २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकलवरून मूळ गावी थेरला येथे परतत होते. दरम्यान, रोहतवाडी ते थेरला गावच्या शिवारात दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून त्यांची दुचाकी अडवली. आरोपींनी राजेंद्र यांना घेरून त्यांच्या ताब्यातील ओपो कंपनीचा मोबाईल आणि खिशातील १ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादीने या लुटीला विरोध केला असता, चोरट्यांनी त्यांच्यावर कोयत्याने भीषण हल्ला चढवला. या मारहाणीत राजेंद्र नागरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २४ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता या घटनेची पोलिसात नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक मस्के या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts