Breaking
Updated: जून 25, 2026
पुतण्याने गळफास घेतल्याचे समजताच चुलत्याचाही मृत्यु
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या सोनू कदम यांनी राहत्या बुधवार (दि.२४) रोजी रात्री घरी गळफास घेतला त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टररांनी तपासणी करुन मृत घोषित केले.सोनुने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्याचे चुलते अशोक कदम हें घरी गेले असता त्यांनाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांचेही निधन झाले.
अवघ्या एका तासाच्या अंतराने कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुहेरी आघातामुळे बार्शी नाका व शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.अशोक कदम हे बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रमंडळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.