Breaking
Updated: जून 23, 2026
भाच्याला वाचवायला गेलेल्या मामाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: शहरातील कोरबू गल्ली येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला मारहाण करणाऱ्यांना जाब विचारल्याच्या रागातून त्याच्या मामावर लोखंडी पाईप आणि लाकडी काठीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ८ जून २०२६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी २२ जून रोजी गेवराई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख आस्लम फसीयोद्दिन (वय ४३, रा. कोरबू गल्ली) यांनी या प्रकरणी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख आस्लम यांचा भाचा अबुजर पठाण याला आरोपी शेख कैफ हमीद, शेख सैफ हमीद आणि शेख शोफियान हारून यांनी ‘आम्ही तुला पैसे आणायला सांगितले असताना तू का गेला नाहीस’ असे म्हणून शिवीगाळ व मारहाण सुरू केली होती. हा प्रकार पाहून शेख आस्लम हे भाचाला वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले. याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करून आस्लम यांच्यावर हल्ला केला. शेख कैफ याने लाकडी काठीने तर शेख सैफ याने लोखंडी पाईपने आस्लम यांच्या डोळ्यावर, पाठीवर आणि हातावर गंभीर मारहाण केली. तसेच शेख शोफियान याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी आस्लम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने एमएलसी रिपोर्टवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस नाईक सोनवणे पुढील तपास करत आहेत.