Breaking

माशांच्या टेंडरच्या पैशांवरून वाद; फायटर आणि दगडाने मारहाण करत तरुणाचे फोडले डोके, चौघांवर गुन्हा

Updated: जून 23, 2026

By Vivek Sindhu

माशांच्या टेंडरच्या पैशांवरून वाद; फायटर आणि दगडाने मारहाण करत तरुणाचे फोडले डोके, चौघांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: तालुक्यातील मेहकरी येथे तळ्यातील मासे पकडण्याच्या टेंडरचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या कुटुंबाला लोखंडी फायटर, लाकडी काठी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हिंसक हल्ल्यात तरुणाचे डोके फुटून तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २१ जून २०२६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरी घडली. याप्रकरणी २२ जून रोजी रात्री अंभोरा पोलीस ठाण्यात गावातीलच चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालन प्रल्हाद गायकवाड (वय ३५, व्यवसाय मजुरी) यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळ्यातील मासे पकडण्याच्या टेंडरच्या पैशांची मागणी केल्याचा राग मनात धरून आरोपी सुदाम साहेबराव गायकवाड, सूरज काशिनाथ गायकवाड, शहाबाई काशिनाथ गायकवाड आणि जितेंद्र जगन्नाथ बर्डे यांनी संगनमत करून शालन गायकवाड यांच्या घरावर हल्ला केला. आरोपींनी शालन आणि साक्षीदारांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच वेळी आरोपींनी लोखंडी फायटर आणि दगडाने हल्ला केल्याने शालन यांच्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर आरोपींनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. अंभोरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार गर्जे पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts