Breaking

चुलत भावाच्या भांडणावरून शेतकऱ्यावर तलवार व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

Updated: जून 23, 2026

By Vivek Sindhu

चुलत भावाच्या भांडणावरून शेतकऱ्यावर तलवार व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: तालुक्यातील लोळदगाव येथे चुलत भावासोबत झालेल्या भांडणाच्या जुन्या वादातून एका ४६ वर्षीय शेतकऱ्यावर तलवार आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींनी संगनमत करून पीडित शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. २२ जून २०२६ रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तिघांविरुद्ध आर्म ॲक्टसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश ज्ञानोबा घोडके असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी स्वतः या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी अंकुश घोडके यांच्या चुलत भावासोबत आरोपींचे पूर्वी भांडण झाले होते. याच कारणाचा राग मनात धरून आरोपी रामप्रभू अंकुश घोडके, अविनाश रामप्रभू घोडके आणि अनिकेत रामप्रभू घोडके यांनी लोळदगाव शिवारात फिर्यादीला गाठले. यावेळी आरोपी अविनाश आणि अनिकेत यांनी हातातील लोखंडी रॉडने अंकुश यांच्या पायावर बेदम मारहाण केली. त्याच वेळी मुख्य आरोपी रामप्रभू घोडके याने त्याच्या हातातील तलवारीने अंकुश यांच्या डोक्यात थेट वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्राणघातक हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(२), ११८(१), ३५१(२), ३(५) आणि आर्म ॲक्टच्या कलम ४/२७ अन्वये गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts