Breaking
Updated: जून 23, 2026
माशांच्या टेंडरच्या पैशांवरून वाद; फायटर आणि दगडाने मारहाण करत तरुणाचे फोडले डोके, चौघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील मुरकुटवाडी येथे किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केल्याची, तसेच साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना २२ जून २०२६ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंग बालाजी तांदळे यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरकुटवाडी येथील रहिवासी नरसिंग तांदळे आणि गावातीलच आरोपी वामन चंद्रकांत कांगणे व एकनाथ चंद्रकांत कांगणे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी वामन कांगणे याने थेट नरसिंग यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना रक्तबंबाळ व गंभीर जखमी केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या साक्षीदारांना दोन्ही आरोपींनी बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी सर्वांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर जखमी तरुणाने बर्दापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार फड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.