Breaking

शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग ; वाहतूक विस्कळीत

Updated: जून 23, 2026

By Vivek Sindhu

शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग ; वाहतूक विस्कळीत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

हजारो शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वेधले लक्ष

अंबाजोगाई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. खरीप हंगाम 2025-26 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना घोषित केल्या प्रमाणे किमान 17500 रुपये पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मंजूर करुन पीकविमा योजना ज्या शेतकरी मदतीच्या हेतूने लागू झाली तो हेतू साध्य करण्यासाठी जुने जोखीम स्तर पूर्वरत करावे. आणि रासायनिक खतांच्या वाढीव किमती कमी करून, बोगस खते, लिंकिंग रोखून पुरवठा सुरळीत करावा या मागण्याला घेत अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत मंगळवार दि 23 रोजी अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बर्दापुर फाट्यावर रस्त्यारोको करत प्रशासनाचे लक्ष वेधले

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कर्जमुक्त योजनेसाठी टाकलेलल्या जाचक अट्टी तातडीने रदद करून सरसगट कर्जमाफी करण्यात यावी, बीड जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे विम्यापोटी 17500 रु विमा देण्यात यावा रासायनिक खते पुरवठा तात्काळ सुरळीत करावा व वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि 23 रोजी बर्दापुर फाटा या ठिकाणी महामार्ग आडवत रास्ता रोको करण्यात आला या प्रसंगी शेतकरी नेते अविनाश मोरे, ऑड.अजय बुरांडे, विलास बापू मोरे, सुरेश घोडके, धनाजी मदने, गोविंद मोरे, भागवतराव निकम, श्रीहरी होळकर, संजय गिराम, निलेश धुमाळ, तानाजी धुमाळ,  विलास धुमाळ, उसामराव जांभळे, गोविंद चव्हाण, अमोल चव्हाण, नितिन शिंदे, वसंत शिंदे, विलास देशमुख, सादेक हुशेन, विभिषन औताडे, बबन भगत, मंचकराव जाधव, राजेभाऊ चव्हाण, नाना यादव, हनुमंत धुमाळ, वैभव काळम यांच्यासह इतर प्रमुख शेतकरी प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून होते.


Categories

Recent Posts