Breaking

अंबाजोगाईत ‘सिनर्जी ग्रुप ऑफ स्कूल्स’च्या नव्या ‘सिनर्जी हाऊस’ शैक्षणिक संकुलाचे १४ जून रोजी भव्य उद्घाटन

Updated: जून 11, 2026

By Vivek Sindhu

पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन

अंबाजोगाई: स्थानिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘सिनर्जी ग्रुप ऑफ स्कूल्स’च्या अंबाजोगाई येथील नव्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे म्हणजेच ‘सिनर्जी हाऊस’चे येत्या रविवारी, १४ जून २०२६ रोजी भव्य उद्घाटन होणार आहे. अंबाजोगाई येथील वंदना मोबाईल समोर, ओमशांतेय बिल्डींग येथे उभारण्यात आलेल्या या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा सकाळी १०:०० वाजल्यापासून सुरू होणार असून, या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पालकांच्या प्रबोधनासाठी दिवसभर विविध ज्ञानवर्धक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून सौ. शांता ओमप्रकाश भुतडा, श्री ओमप्रकाश भुतडा, सौ. विमल मारोतीराव रेड्डी आणि श्री मारोतीराव रेड्डी यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

‘लर्निंग टुडे, लीडिंग टुमारो’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या सिनर्जी ग्रुपने या सोहळ्याचे औचित्य साधून पालकांसाठी विशेष अभ्यासपूर्ण व्याख्याने आयोजित केली आहेत. यामध्ये पैशांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मुलांमध्ये आर्थिक शिस्त कशी विकसित करावी, याविषयी अमेरिकेतील नामांकित वित्त सल्लागार श्री संतोष बिराजदार यांचे मार्गदर्शन सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होईल. याच वेळेत समांतर सत्रात ‘पालकत्वाचा नवा दृष्टिकोन- कठोर शिस्त की सकारात्मक मार्गदर्शन?’ या अत्यंत संवेदनशील विषयावर लातूर येथील स्टीम एज्युकेशन सेंटरचे संस्थापक प्रा. ओमप्रकाश झुरुळे पालकांशी संवाद साधणार आहेत.

दुपारच्या सत्रात मुलांमध्ये लहान वयातच बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व रुजवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या रोहिणी पाठक यांचे ‘आर्थिक साक्षरतेची सुरुवात’ या विषयावर दुपारी १ ते २ या वेळेत व्याख्यान होईल. त्याचप्रमाणे, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात भविष्यातील करिअरची दिशा कशी असावी, तसेच एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), डिझाईन, वित्त आणि क्रीडा क्षेत्रातील नव्या संधी कोणत्या, यावर सिनर्जी ग्रुप ऑफ स्कूल्सचे चेअरमन श्री संदीपान रेड्डी यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सिनर्जी ग्रुपचे चेअरमन श्री संदीपान रेड्डी, सचिव श्री रमाकांत माने, संचालक श्री नाथराव रेड्डी, डॉ. अनिल भुतडा, डॉ. श्रीनिवास रेड्डी आणि कार्यकारी संचालिका प्रा. भाविका शहा यांच्यासह सर्व व्यवस्थापन समिती, प्राचार्य व शिक्षक कर्मचारी परिश्रम घेत आहेत. अंबाजोगाई आणि परिसरातील सर्व पालकांनी व नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्याला आणि माहितीपूर्ण सत्रांना सहकुटुंब उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts