Breaking

अंबाजोगाईत पंकजा मुंडे यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा

Updated: जून 4, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत पंकजा मुंडे यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर भागातील नवीन जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला. या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या व गाऱ्हाणी थेट ऐकून घेत ती जागेवरच मार्गी लावली. परळी व केज मतदारसंघातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विशेष शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

या दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेला भेट दिली. तेथे आधुनिक पद्धतीच्या गोकाष्ठ यंत्राचे उद्घाटन करून शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या उत्पादनांचे कौतुक केले. यानंतर त्यांनी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि भाजप प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दिल्या. तसेच माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व पुरुषोत्तम भन्साळी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल त्यांच्या घरी जाऊन शोकग्रस्त कुटुंबांचे सांत्वन केले.


Categories

Recent Posts