Breaking
Updated: मे 4, 2026
राहिल्यासच अर्थिक सक्षमीकरण होईल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई(प्रतिनिधी) – महिला जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा टाकणार नाही तोपर्यंत अर्थिक सक्षमीकरण होणार नाही
घर चालवताना खर्च करण्याचा निर्णय कमावणाऱ्या स्त्रीला जेव्हा प्राप्त होईल तेव्हा खऱ्या अर्थाने सक्षमीकरण झाले असे म्हणता येईल आणि हे सक्षमीकरण होणे काळाची गरज आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या तथा लातुर जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई भिसे यांनी व्यक्त केले.
त्या योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी, श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, श्रीमती गो.कु.यो. कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीरातील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
शिबीरार्थीं विद्यार्थिनी समोर बोलताना आशा भिसे म्हणाल्या की,
जेव्हा अर्थकारणात महिला येईल निर्णय प्रक्रियेत महिला येईल तेव्हाच महिला खऱ्या अर्थाने सक्षम होईल महिलांचा आहार ताकद हा सुद्धा सक्षमीकरणाचाच भाग आहे त्यामुळे संतुलित आहार घेऊन स्वतःची प्रकृती उत्तम ठेवून स्वतःचा सन्मान राखावा आणि स्वतः विविध चळवळीत अग्रेसर रहावे विशेष म्हणजे महिलांनी हक्क अधिकार यासाठी लढाई स्वतः लढली पाहिजे. महिला पूर्वी व आज तसेच वर्तमानात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून आपले घर,संसार आणि सामाजिक जबाबदारी पार पाडत असते महिलांसाठी विविध कायदे असून देखील महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना व्हायला न पाहिजेत आधुनिक काळात महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे यापुढेही महिलांनी आपापल्या क्षेत्रात काम करत असताना आपला स्वाभिमान, आत्मसन्मान बाळगतील हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी संस्था पदाधिकारी, शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.