Breaking

धारूरमध्ये भावाच्या भांडणात ५० हजारांची वैरण खाक

Updated: एप्रिल 16, 2026

By Vivek Sindhu

धारूरमध्ये भावाच्या भांडणात ५० हजारांची वैरण खाक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर: कासारी येथे वैरण टाकण्याच्या वादातून दत्तात्रय डोईफोडे याने आपला भाऊ विभीषण याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले आणि शेतातील ५० हजार रुपयांचा कडबा जाळून टाकला. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात मारहाण आणि आगी लावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार पुरी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


धारूर तालुक्यातील कासारी गावातून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दारात वैरण टाकली म्हणून सख्या भावाने आपल्याच भावाचे डोके फोडले आहे. एवढ्यावरच न थांबता रागाच्या भरात आरोपीने भावाच्या शेतातील ५० हजार रुपये किमतीचा कडबा जाळून खाक केला आहे. या प्रकरणी धारूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


Categories

Recent Posts