Breaking
Updated: एप्रिल 16, 2026
वडमाऊली मंदिराजवळ तरुणाला बेदम मारहाण; डोके फोडून जिवे मारण्याची धमकी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे देवीच्या मंदिरासमोर एका तरुणाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुणाचे डोके फुटले असून चार जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कानडीमाळी येथील रहिवासी कालिदास या तरुणाने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास कालिदास हे वडमाऊली मंदिराजवळ उभे असताना आरोपी श्रीराम सीताराम कदम, रायचंद श्रीराम कदम, चंद्रसेन श्रीराम कदम आणि रमेश श्रीराम कदम (सर्व रा. पिराचीवाडी) यांनी संगनमत करून त्यांना गाठले. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी आरोपी श्रीराम कदम याने हातातील दगडाने कालिदासच्या डोक्यात मारून त्याला रक्तबंबाळ केले. इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि पुन्हा दिसल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. केज पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार आघाव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.