Breaking

विहिरीचे पाणी देण्यावरून वाद; महिलेला मारहाण करून मुलाचे डोके फोडले

Updated: जानेवारी 30, 2026

By Vivek Sindhu

विहिरीचे पाणी देण्यावरून वाद; महिलेला मारहाण करून मुलाचे डोके फोडले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पिंपळनेर: शेतातील गव्हाला पाणी देण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून तिच्या मुलाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केल्याची घटना आहेरधानोरा येथे घडली आहे.

आहेरधानोरा येथील रहिवासी सुरेखा बाबासाहेब फाटक (वय ४५) यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुरेखा यांनी आरोपी ईश्वर गोपीनाथ फाटक याला सामाईक विहिरीवरील पाणी गव्हाला देण्यास सांगितले होते. याचा राग आल्याने ईश्वरने “मी पाणी बाहेर विकले आहे, तुला पाणी देऊ शकत नाही” असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच सुरेखा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सोडवण्यासाठी आलेल्या अनिकेत याच्या डोक्यात ईश्वरने दगड मारून त्याला गंभीर जखमी केले.

या प्रकरणी २९ जानेवारी रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार बनवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Related Posts :

Categories

Recent Posts