Breaking
Updated: जानेवारी 3, 2026
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीओ विठ्ठल नागरगोजे यांचा सन्मान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – दिवाळी नवीन घरकुलात – २०२५ या उपक्रमात घरकुल बांधकामाचे उद्दिष्टपूर्ती करीत १५०.२६ टक्के काम पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वडवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामकाजास गती देण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या “दिवाळी नवीन घरकुलात – २०२५” या उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दिलेले वडवणी तालुक्यासाठी १६९९ घरकुल बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी हे उद्दिष्ट पूर्ण करून २५५३ घरकुले बांधकाम पुर्ण करून १५०.२६ टक्के काम करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या सरस कामगिरीबद्दल गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचा प्रशस्ती पत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विक्रम काळे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची प्रमुख उपस्थिती होती.