Breaking
Updated: सप्टेंबर 27, 2025
२५० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गोवर-रूबेला लसीकरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगोवर-रूबेला (एमआर) लसीकरण मोहिमेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बालासाहेब दोडतले आणि जोगाईवाडी – चतुरवाडीचे उपसरपंच अनिल मस्के, धनराज राठोड (ग्रामपंचायत जोगाईवाडी सदस्य) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.किरण लोंढे, (समुदाय आरोग्य अधिकारी) यांनी विद्यार्थ्यांना गोवर आणि रूबेला या आजारांबाबत तसेच लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ.अजय माळी (वैद्यकीय अधिकारी) यांनी लसीकरण प्रक्रियेचे सुपरव्हिजन केले आणि मोहीम यशस्वी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. या मोहिमेला आश्रमशाळेच्या प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.आर.राठोड आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.ए.राठोड यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शाळेच्या सहकार्यामुळे लसीकरण प्रक्रिया अतिशय सुव्यवस्थितपणे पार पडली. आरोग्य विभागाचे योगदान या मोहिमेला जिल्हा आणि तालुकास्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांचे ही मार्गदर्शन लाभले. यामध्ये डॉ.उल्हास गंडाळ (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बीड), डॉ.रौफ शेख (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड), डॉ.सचिन शेकडे (माता व बाल संगोपन अधिकारी, बीड), डॉ.बालासाहेब लोमटे (तालुका आरोग्य अधिकारी, अंबाजोगाई) आणि डॉ.अभिजीत अंजान (वैद्यकीय अधिकारी) यांचा समावेश होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मोहीम यशस्वी होण्यास मोठी मदत झाली. लसीकरण कॅम्प यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बर्दापूर आणि उपकेंद्र राडी येथील सर्व कर्मचारी, एलएचव्ही, बीएफ, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि आशा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यातील योग्य समन्वय आणि मेहनतीमुळे ही मोहीम निर्विघ्नपणे पूर्ण झाली. एकूण २५० मुला-मुलींना गोवर आणि रूबेला या आजारांपासून संरक्षण देणारी लस देण्यात आली.
गोवर – रूबेला लसीकरणाचे महत्त्व :
गोवर आणि रूबेला हे दोन्ही गंभीर संसर्गजन्य आजार असून, विशेषतः लहान मुलांमध्ये यामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. रूबेला हा गर्भवती महिलांच्या गर्भातील बाळासाठीही धोकादायक ठरू शकतो. लसीकरणामुळे या आजारांपासून संरक्षण मिळते आणि सामुदायिक रोगप्रतिबंधक क्षमता वाढते. या मोहिमेच्या माध्यमातून कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना या आजारांपासून संरक्षण मिळाले आहे. भविष्यातील उपक्रम आयुष्यमान आरोग्य मंदिर राडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बर्दापूर यांनी भविष्यातही अशा आरोग्यविषयक मोहिमा राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलांना आणि समुदायाला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे आनंदनगर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित झाले असून, आरोग्य विभाग आणि शाळा प्रशासनाच्या सहकार्याचे कौतुक होत आहे.