Breaking
Updated: सप्टेंबर 24, 2025
माजी शिक्षकांना निरोप, नव्यांचे स्वागत: प्रगतशील शाळेचे आदर्श उदाहरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – परळी तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात, निरोप घेणारे शिक्षक आणि नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.श्री आर .एस. मठपती, मुंडे सर,सौ. उज्ज्वला स्वामी आणि कुदळे मॅडम यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर, शाळेत नव्याने रुजू झालेले श्री चामनर सर, मोदे मॅडम आणि संकाये मॅडम यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या निमित्ताने, शाळेने शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि गावातील शैक्षणिक वातावरणात झालेल्या सकारात्मक बदलांचा गौरव करण्यात आला.
● शिक्षणाने घेतली ‘गरूड झेप’
यावेळी बोलताना, गावकरी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर माऊली गडदे यांनी सांगितले की, “आजपर्यंत आमच्या शाळेला असे समर्पित आणि कर्तृत्ववान शिक्षक लाभले नव्हते. त्यांच्या योगदानाने केवळ विद्यार्थ्यांमध्येच नाही, तर संपूर्ण गावात शिक्षणाबद्दलची जनजागृती झाली. शिक्षकांनी मुलांना शिकण्याची गोडी लावली, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण झाले आहे. यामुळेच, आमच्या शाळेने खऱ्या अर्थाने ‘गरूड झेप’ घेतली आहे.”
● भौतिक सुविधांचा विकास आणि शाळेचे सक्षमीकरण
पुढील काळात शाळेचा आणखी विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ज्ञानेश्वर माऊली गडदे म्हणाले , लवकरच ही शाळा सातवीपर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. “यापुढे, शाळेसाठी आणि गावातील मुलांच्या भविष्यासाठी कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही,” असे आश्वासन देण्यात आले. गावातील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संपूर्ण गाव आदर्श गाव बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
माजी शिक्षकांचा सन्मान, नव्यांचे स्वागत
या कार्यक्रमात, श्री आर .एस. मठपती, मुंडे सर,सौ. उज्ज्वला स्वामी आणि कुदळे मॅडम यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर, शाळेत नव्याने रुजू झालेले श्री चामनर सर, मोदे मॅडम आणि संकाये मॅडम यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर माऊली गडदे , सुरेखाताई ज्ञानोबा गडदे (सरपंच), सुधीर शिंदे (उपसरपंच), दामोदर गडदे (अध्यक्ष शा.व्य.स.), भाऊसाहेब गडदे, डी.एन.पाटील, श्रावण बप्पा बनसोडे, धनराज बनसोडे, सिद्धेश्वर रूपनर, श्रीमंत रूपनर, अभिमन्यु शिंदे, शिवाजीराव शिंदे (पो.पा.) आणि प्रदीप थिटे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.