Breaking

गाडी अडवून शेतकऱ्याला मारहाण, जीव घेण्याची धमकी; चार आरोपींवर गुन्हा दाखल

Updated: सप्टेंबर 9, 2025

By Vivek Sindhu

सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

तलवाडा : अर्धमसला फाटा येथे बोलेरो गाडी अडवून शेतकऱ्याला लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी नितीश रोहीदास राठोड (वय ३३, व्यवसाय शेती, रा. मारफळा तांडा, ता. गेवराई, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अशोक सुदाम नाडे, विकास अशोक नाडे (दोन्ही रा. कुंभारी पिंपळगाव, ता. घनसावंगी, जि. जालना), सचिन लक्ष्मण मोमीन (रा. मारफळा, ता. गेवराई, जि. बीड) व आलीम (पूर्ण नाव माहिती नाही, रा. डोंगरे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

०८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता फिर्यादी व साक्षीदार बीडहून गावी जात असताना आरोपींनी दोन स्विफ्ट गाड्यांतून येऊन त्यांची बोलेरो गाडी अडवली. यापूर्वी सकाळी १०.३० वाजता पोपट सुरेश राठोड व आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहाराचा वाद मिटवला होता. त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून गंभीर दुखापती केल्या. शिवाय शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सुरू असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.


Related Posts :

Categories

Recent Posts