Breaking

आपेगावच्या चौघांची महवितरणमध्ये निवड

Updated: ऑगस्ट 20, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 08 20 at 18.51.56 b8ccdaab

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : तालुक्यातील आपेगाव येथील तीन युवक व एका युवतीची महावितरण व महापारेषण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांच्या ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने स्वातंत्र्य दिनी सत्कार करण्यात आला.

आपेगाव येथील जयकिसान विद्यालयातील तांत्रीक विद्यालयाचे विद्यार्थी अमरजित रंजित शिंदे, गणेश बळीरात बिडवे, अनिकेत दत्तात्रय सावंत या तीन विद्यार्थ्यांची महापारेषण व महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. तर गावच्या सुन फिरदौस अलीम शेख यांची महावितरण विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. या निवडी बद्दल गावच्या ग्रामपंचायतेच गटनेत निलेश शिंदे, सरपंच प्रशांत सरवदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच जयकिसान विद्यालयाच्या वतीने सचिव प्रा. जयजीत शिंदे, सहसचिव सौ. व्हि. जे. शिंदे, मुख्याध्यापक प्रा. एन. के. हजारे, प्रा. पी. एस. तरकसे यांच्या वतीने पालकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला


Categories

Recent Posts