Breaking
Updated: ऑगस्ट 14, 2025
दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन संपविले जीवन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यातील सांगवी (सा.) येथे ७० वर्षीय शेतकऱ्याने गोठ्यात तर कोरेगाव येथे ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटना बुधवारी (दि.१३) सायंकाळी उघडकीस आल्या. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
सांगवी (सा.) येथील पांडुरंग विठ्ठल केदार (वय ७०) या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत बुधवारी दुपारी शेतातील गोठ्यात आडूला धोतराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तर दुसऱ्या घटनेत कोरेगाव येथे बाळू कारभारी साबळे (वय ४०) या शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेऊन शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.या घटनांची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशावरून फौजदार जावेद कराडकर, सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण, जमादार सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले.