Breaking
Updated: ऑगस्ट 12, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelतलवाडा – वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान हातात धारदार तलवार घेऊन केक कापणाऱ्या तरुणाला तलवाडा पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकाऱ्यांना 11 ऑगस्ट रोजी व्हॉट्सअॅपवरून माहिती मिळाली की, आरोपी बिलाल मुन्शी शेख (वय 22, रा. राजापूर, ता. गेवराई, जि. बीड) याने नातेवाईकाच्या लहान मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हातात लोखंडी तलवार घेऊन फोटो काढला आणि तो व्हायरल झाला आहे.
यावर कारवाई करत पोलिसांनी बिलालच्या घरावर छापा टाकला असता त्याठिकाणी एक धारदार तलवार आढळली. ती जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, सहायक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली, तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि मनोज निलंगेकर यांच्या नेतृत्वात पोउपनि स्वप्निल कोळी, पोह. नारायण काकडे, पोह. मोहसिन शेख आणि पोअं. अमोल अवसरमल यांनी केली.