Breaking
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे रविवारी (दि. २९ जून) रात्रीच्या सुमारास एका दहा वर्षीय बालिकेचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. रेणुका राजू गुंजाळकर (वय १०) असे त्या मृत बालिकेचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुकाचे आई-वडील हे लोणार (जि. बुलढाणा) येथून दगडफोडीच्या कामासाठी घाटनांदूर येथे आले होती. रविवारी रात्री रेणुका खेळत असताना विहिरीकडे गेली आणि अपघाताने पाण्यात पडली. या घटनेत तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे. मृतदेहेचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Last Updated: June 30, 2025
Share This Post