Breaking

वैद्यनाथ बँक निवडणुकीत 37.5 टक्के मतदान; निकाल 12 ऑगस्टला

Updated: ऑगस्ट 10, 2025

By Vivek Sindhu

the vaidyanath urban co operative bank ltd parli vaijnath parli vaijnath banks

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी : वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज विविध मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी चार वाजता मतदान संपले असून, एकूण सरासरी 37.5 टक्के इतके मतदान झाले आहे. अपेक्षेपेक्षा ही टक्केवारी कमी असल्याचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानले जात आहे.

बँकेसाठी परळीपासून ते मुंबईपर्यंत पसरलेल्या 36 केंद्रांवर मतदान झाले. एकूण 43 हजार 962 मतदारांपैकी 16 हजार 287 मतदारांनीच आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत एकूण 17 जागा असून, त्यापैकी चार जागा पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल’ने अगोदरच बिनविरोध जिंकल्या आहेत. उर्वरित 13 जागांसाठी आजची मतदान प्रक्रिया झाली.

12 ऑगस्ट रोजी बीड येथे मतमोजणी होणार असून, त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळावर कोणाचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट होईल. मतदारांनी दिलेल्या कौलातून कोणते उमेदवार विजयी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Categories

Recent Posts